वाघाचे हल्यात शेतकरी ठार ; विरुर वनपरिक्षेत्राचे खिर्डी येथील घटना

75

 

राजुरा, प्रतिनिधी-
राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या लक्कलकोट नियत क्षेत्राचे परिसरातील आनंद गुडा येथील शेतकरी खिर्डी परिसरातील शेतात काम करीत असतानाच वाघाने अचानक हल्ला करीत ठार केल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

पत्नी समोरच हा घडलेला प्रकार गावात येऊन सांगितला गावकर्यानी वनकर्मचाऱयानाही सांगितले आणि घटनास्थळाकडे धाव घेतली वन कर्मचारीही रवाना झाले आहे दरम्यान वनकर्मचारी मोका पंचनामा करून मृतकाचे नातेवाईकास तात्काळ 25 हजार रुपये मदत देण्यात आली असून पुढील आर्थिक मदत तात्काळ दिली जाणार आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी सांगितले यावेळी गावपाटील,मृतकाचे नातेवाईक लक्कलकोटचे माजी उपसरपंच मनोज मून,पोलीस पाटील दिनकर आडे,तंटामुक्ती अध्यक्ष राकेश लाडके,चिनू आत्राम,श्रीनिवास जुपाका,रघुनाथ गेडाम,भाऊराव कुलसंगे,राणजेश कोलपकवार,सतय्याजी,क्षेत्र सहायक मनोज गोरे उपस्थित होते
दरम्यान मृतकाचे शव पुढील कार्यवाहिस ताब्यात घेऊन राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे
पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार आणि राजुरा पोलीस करीत आहेत