औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली येथे मतदार नोंदणी शिबीर

46

 

 

तहसील कार्यालय सावली व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2022 रोजी नवीन व भावी मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्याकरिता शिबीर पार पडले.

सदर शिबीर तहसीलदार श्री परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शनात व नायब तहसीलदार सागर कांबळे, शिल्पनिर्देशक बारशिंगे यांचे उपस्थितीत पार पडले.

यावेळी सागर कांबळे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार नोंदणीचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे 1 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होणार आहेत अशा सर्वांनी मतदार नोंदणी करण्याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.