उद्या अतिक्रमधारकांचा सावली तहसिल कार्यालयावर मोर्चा

49

 

 

सावली –
सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार सावली यांचेकडून सदर अतिक्रमण हटविण्याची नोटीस देण्यात आली असल्याने याविरोधात तालुका कॉंग्रेच्या वतीने तहसिल कार्यालयावर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात घराखालील अतिक्रमण हटवू नये, अतिक्रमनधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे या मागण्या घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चात अतिक्रमनधारकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका काँगेस, महिला आघाडी व युवा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.