सावली येथे एक दिवसीय शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

83

 

सावली :– भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावली, कुनघाडा , भेंडाळा, मारोडा व बोथली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात संपन्न झाली . सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव तथा मातोश्री विद्यालयाचे माजी प्राचार्य सूर्यकांत खनके हे होते .

त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे महत्व तसेच शिक्षक व विद्यार्थी पालकांचा सहभाग कसा वाढवून घ्यावा यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आनंददायी शिक्षण कसे देता येईल याचे मार्गदर्शन केले.
त्या अगोदर भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी कार्य शाळेचे उदघाटन केले.

त्यांनी बोलताना आजचा शिक्षक कृतिशील व परिपूर्ण पाहिजे. तसेच स्पर्धेच्या युगात त्यांनी आपले कौशल्य वाढ वायला पाहिजे असे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार, सदस्य सुनील बल्लमवार, सदस्य संजय पाटील शृंगारपवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व शाळांचे मुख्याध्यापक रवी मुप्पावार , सुनील येनगंटीवार, प्रमोद फुलबांधे , दिलीप डांगे व कमलाकर पाडेवार हे उपस्थित होते. एकदिवशीय कार्यशाळेमध्ये मंडळा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.