Home
Homeमहाराष्ट्रपशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

 

 

पशुसंवर्धन विभागातंर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी नविण्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे तसेच 100 कुक्कुट पिल्लाचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज तसेच योजनेची संपुर्ण माहिती https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच गुगल प्ले स्टोअरवरील अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे AH-MAHABMS यावर उपलब्ध आहे.

अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जाणार आहेत. संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करून पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी अर्ज भरण्याकरीता स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ यावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर यांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !