सरकारी जागेवरील अतिक्रमण न हटविता त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे -कांग्रेस नेते दिनेश चिटनूरवार यांची प्रशासनाकडे मागणी

56

 

*सावली(सूरज बोम्मावार)*
सावली तालुक्यातील अनेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने सावली तालुक्यातील अतिक्रमण धारक धास्तावलेल्या स्तिथीत आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण न हटविता त्यांना कायम स्वरूप पट्टे देण्यात यावे असे सावली तालुक्यातील कांग्रेस नेते दिनेश चिटनूरवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.

सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार परीक्षित पाटील यांचेकडून सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली असून २२ नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यामुळे अतिक्रमनधारक धास्तावले आहेत.

सदर जमिनीवर पक्के घरे बांधकाम झालेले आहे, त्याच जागेवर शासनाकडून आवास योजनेची घरकुल बांधकाम झालेले आहे, त्याच वस्तीत शासकीय योजनेतून रस्ते, नाली व शासकीय इमारतीचे बांधकाम झालेले आहेत मात्र नुकतेच तहसिलदार सावली यांनी नोटीस पाठविल्याने अतिक्रमनधारकांवर बेघर होण्याची पाळी आहे.

त्यामुळे त्यांचे अतिक्रमण हटवू नये हटवू नये त्यांना बेघर करू नका व त्यांना कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावी अशी मागणी कांग्रेस चे नेते दिनेश चिटनूरवार यांनी प्रशासन कडे केली आहे.

या संदर्भात चिटनूरवार हे वरिष्ठ नेत्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविलेले आहे.