अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट ठार # बल्हारपुर चंद्रपुर मार्गावरील भिवकुंड जवळील घटना#

95

राजुरा (संतोष कुंदोजवार)-
चंद्रपूर बल्हारशाह मार्गावरील म भिवकुंड येथील निर्मल धाबा जवळील नाल्या जवळ दिनांक 20 नोव्हेंबर रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञान वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाला.

माहिती मिळताच बल्हारशाहचे नरेश भोवरे आणि अधिनस्त कर्मचारी यांचे सह घटना स्थळी दाखल झाले व मृत बिबटयाचा शवाचा मौका पंचनामा करुन शवास ताब्यात घेतले . बिबट या वन्यप्राण्याच्या डोक्याला जबर मार लागुन मोठया प्रमाणात रक्त स्त्राव झाल्यामुळे सदर बिबट मृत पावल्याबाबत प्रथम दर्शनी निदर्शणास आले . सदर बिबट ही मादी असुन तीचे वय अंदाजे 3 ते 4 वर्ष इतके आहे . बिबट वन्यप्राण्याचे शव डिप फ्रिजर मध्ये ठेवण्याकरीता वन्यजिव उपचार केन्द्र , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपुर येथे नेण्यात आले असुन सकाळी 11 वाजता बिबटचे शवविच्छेन वन्यजीव उपचार केन्द्र , ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , चंद्रपुर येथे करण्यात येणार आहे . सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसरक्षक श्वेता बोड्डु , सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे हे करीत आहे .
सदर ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होती त्यावेळी पोलीस स्टेशन , बल्हारपुर येथील पोलीस कर्मचारी यांनी मेहनत घेवुन वाहतुक सुरळीत पणे सुरु करुन वनविभागास मदत केली . यावेळी वनरक्षक कु . वर्षा पिपरे , . एस . एम . बोकडे , टि.ओ. कामले व ए . एम . चहांदे हे सदरचे कार्यवाहीत सहभागी होते . •