Home
Homeमहाराष्ट्रभगवान बिरसा मुंडा चे आदर्श आदिवासी समाजाने जपावे :- प्रवीण गेडाम

भगवान बिरसा मुंडा चे आदर्श आदिवासी समाजाने जपावे :- प्रवीण गेडाम

सावली….
भगवान बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती सावली तालुक्यातील हिरापूर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आली.
यावेळी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना सावली तालुका अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी
भगवान बिरसा मुंडा यांच् जन्म १५नोव्हे १८७५ राची येथील उलीहातु या ठिकाणी झाला प्राथमिक शिक्षण जर्मनी मिशनरी मध्ये बिरसाने घेतला. मात्र ब्रिटिशाकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार भगवान बिरसा मुंडा ना असाय झाले त्यामुळे बिरसा मुंडाणे ब्रिटिशा विरुद्ध उल गुलगुलान करून हमारे देश मे हमारे राज मावा माटे मावा राज ही संकल्पना घेऊन बिरसा मुंडा नी , ब्रिटिशांना सडो कि पडो केले मात्र समाजातील व्यक्ती फितूर झाल्याने भगवान बिरसा मुंडा ना ब्रिटिशांनी पकडून फाशीची शिक्षा देण्यात आली जल जंगल जमिनीचा खरा आदिवासी हा मालक असून आदिवासी होत असलेल्या अत्याचाराला बडी न पडता बिरसा मुंडाणे इंग्रजा विरुद्ध बंड पुकारला त्यामुळे बिरसा मुंडा ना पकडून फाशी देण्यात आली त्यांचा मृत्यू ९जून१९००ला झाला. या पंचवीस वर्षात केलेल्या ब्रिटिश राजवटी विरोधात क्रांतीला न विसरता आदिवासी समाजाने जननायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचे आदर्श जपून आदिवासी समाजाने सामाजिक कार्य करावे बिरसा मुंडा चा संपूर्ण जन्म ते मृत्यूपर्यंत बिरसा चे कार्य आणि त्यांच्या जीवन चारित्र्यावर प्रतिपादन प्रवीण गेडाम यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विलास आत्राम औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर. उद्घाटक आरोग्य विस्तार अधिकारी फाल्गुन आत्राम. दीपप्रज्वलन नथू शेडमाके. तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या योगिता ताई पेंदाम (डबले) , मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, रघुराज शेडमाके समाज अध्यक्ष. आयोजक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, आणि आदिवासी महिला भगिनी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते,
दुपारी दोन वाजता भव्य दिव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर सल्ला घागरा पूजा मग मार्गदर्शन कार्यक्रम आणि रात्रोला विद्यार्थ्याचे रे ला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला …..

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !