
सावली(प्रतिनिधी)
सावली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत उपक्षेत्र – व्याहाड, नियतक्षेत्र – सामदा मौजा सामदा येथे दिनांक 18.11.2022 रोजी गुप्त माहिती मिळाली असता नामे महादेव सावजी पोहनकर रा. सामदा ता. सावली जि. चंद्रपुर यांचे घरी जावुन झडती पत्रानुसार त्यांचे घराचे झडती घेतले असता.वन्यप्राणी भेकरचे शिजलेले मास असल्याने सदर घटनेची पंचासमक्ष पंचनामा नोंदविण्यात आला व जप्त करण्यात आले.

सबंधित आरोपीचे सखोल चौकशी केली असता श्रीमती अंजनाबाई कवडु भांडेकर खाजगी पडीत शेत गट क्रमांक 1042 मौजा- सामदा यांच्या शेतामध्ये सबंधितांनी दिनांक 17.11.2022 अंदाजे दुपारी 2.00 वाजता ते 2.30 वाजताच्या दरम्यान वन्यप्राणी भेकरची शिकार केली.
तसेच आरोपी वरील इसमाने सदर शिकार केले व मास खाण्याकरीता घरी आणले. सदर प्रकरणात इतर 8 आरोपींचे नावे चौकशी दरम्यान उघड झाले. सदर घटनेचे मोका पंचनामा व जप्ती नामा तयार करुन आरोपीवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.
सदरची कार्यवाही प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर, कु. एन. जे. चौरे, सहाय्यक वनसंरक्षक ( तेंदु) चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली व्हि. ए. राजुरकर, वनपिरक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सावली, क्षेत्र सहाय्यक, व्याहाड, क्षेत्र सहाय्यक, पेंढरी व नियतक्षेत्र वनरक्षक यांनी समोरील चौकशी करुन सदर आरोपींना दिनांक 19.11.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता अटक करण्यात आले. व आरोपींना मा. कोर्ट विद्यमान, प्रथम श्रेणी न्यायालय, सावली येथे हजर करण्यात आले.
- व सदर घटनेतील आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिनांक 02.12.2022 पर्यंत मिळालेली असुन सदर आरोपींना जिल्हा मध्यवर्ती कारागृह चंद्रपुर येथे रवानगी करण्याचे मा. कोर्ट न्यायालय, सावली यांने आदेश दिले.
