सरकारी जागेवरील निवासाची घरे हटवू नका ; माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात निवेदन सादर

74

सावली – अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने अतिक्रमनधारकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. बेघर होण्याची पाळी येत असल्याने अतिक्रमण हटवू नये असे निवेदन माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसीलदार यांना देण्यात आले.
सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार सावली यांचेकडून सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली असून २२ नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यामुळे अतिक्रमनधारक धास्तावले आहेत. सदर जमिनीवर पक्के घरे बांधकाम झालेले आहे, त्याच जागेवर शासनाकडून आवास योजनेची घरकुल बांधकाम झालेले आहे, त्याच वस्तीत शासकीय योजनेतून रस्ते, नाली व शासकीय इमारतीचे बांधकाम झालेले आहेत मात्र नुकतेच तहसिलदार सावली यांनी नोटीस पाठविल्याने अतिक्रमनधारकांवर बेघर होण्याची पाळी आहे. त्यामुळे आंदोलनाचा इशारा देत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करू नये असे निवेदन जिल्हाधिकारी व तहसिलदार सावली यांना माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी अरविंद भैसारे, युवराज पेंदाम, अतुल येलट्टीवार, राजू कंचावार, रमेश मोहूर्ले, संजय मडावी, सौगंध मोहूर्ले यांनी निवेदन दिले.