लोकन्यायालयात 31प्रकरणाचा निपटारा ;कायदेविषयक जनजागृती मोहीमेचा सावली त समारोप.

106

 

सावली(प्रतिनिधी) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती सावली यांच्या संयुक्त विद्यमाने. सावली न्यायालयाच्या प्रांगणात 12नोव्हेबंर रोजी आयोजित लोकन्यायालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला लोकन्यायालयात 31प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.

कार्यक्रमात दिवाणी फौजदारी न्यायधीश कनिष्ठ स्तर.न्यायदंडाधिकारी.प्रथमश्रेणी तालुका विधी समिती सावली चे अध्यक्ष जगताप साहेब समिती चे सदस्य डॉ षडाकांत एम कवठे तसेच अॅड गणेश ठिकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यामध्ये विविध कायदे यासंबंधी महत्त्व विशद केले लोकन्यायालयात आपसातील तडजोडीने प्रकरण कसे मिटवता येईल यावर मार्गदर्शन केले संचालन प्रास्ताविक डॉ षडाकांत कवठे तर आभार अॅड गणेश ठिकरे यांनी केले आणि अॅड धनजंय आबंटकर अॅड पी.पी.शेंडे अॅड आदर्श गेडाम यांनी लोक अदालत मध्ये आणि कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम मध्ये सहकार्य केले.