सावली पोलीस स्टेशन तर्फे पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रम

37

 

 

आज दि.17/1122 रोजी पो.स्टे सावली येथे पोलिस भरती संबंधाने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरात विद्यार्थांना पोलिस अंमलदार व अधिकारी कडून शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दि.24/11/22 पासून नियमित शारीरिक चाचणी सराव व लेखी परीक्षा बाबत वर्ग घेण्यात येणार आहे.

सावली तालुक्यातून कमीतकमी 15 ते 20 विद्यार्थ्यांच्या पोलिस भरती निवडीचे उद्दिष्ट आहे.तसेच सादर शिबिरात ट्राफीक नियम,सायबर क्राईम व Pocso कायद्याबाबत सुद्धा थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले.अंदाजे 100 विद्यार्थी हजर होते. ठाणेदार आशीष बोरकर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक युवकांनी ठाणेदार आशिष बोरकर यांचे आभार मानले.