
####################################

एस न्यूज नेटवर्क चे खेडी येथील प्रतिनिधी संतोष कंचावार यांचे दुःखद निधन झाले.ते फक्त 31 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
पोंभुरणा येथे कॉम्प्युटर इंशट्यूट चालवीत होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी येथील आश्रम शाळेत संगणक शिक्षक म्हणून ते काम करीत होते. धनगर समाजाच्या प्रत्येक सामाजिक लढ्यात हिरहिरीने सहभाग दर्शवणार युवा नेता हरपला अशी प्रतिक्रिया डॉ.तुषार मारलावार यांनी दिली. तर संतोष च्या निधनाने समाजात चांगला नेतृत्व गेला असून त्याची उणीव कायम राहील अशी प्रतिक्रिया माजी सभापती विजय कोरेवार यांनी दिली.
संतोष कंचावार याची तब्येत बरोबर नसल्याने त्याला चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.8 दिवसानंतर त्याला नागपूर येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले.एक आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच त्याची आज प्राण ज्योत मालावली. संतोष चा मागील वर्षीच विवाह झाला.तो परिवारात एकुलता एक होता. शांत स्वभाव व नेहमी प्रसन्न राहणारा संतोष च्या निधनाने खेडी व परिसरात शोककळा पसरली आहे.त्याच्या वर आज खेडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
💐💐💐💐
शोकाकुल :- एस न्यूज नेटवर्क सावली