ब्रेकिंग न्यूज….. कामाच्या दबावाने आयटीआय च्या कर्मचारी ची आत्महत्या!

258
########

$$$$$$$$$$$$

सावली(प्रतिनिधी)
सावली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील लिपिक प्रवीण जी. केमेकार वय 32 वर्ष याने तन नाशक विषारी औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवली.या घटनेने खळबळ माजली असून कामाच्या वाढत्या दबावाने आत्महत्या केले असल्याचे बोलले जात आहे.

 

आज दिनांक 14/11/22 ला सकाळी सहा वाजता आपल्या कॉलनीतील काही लोकांसोबत फिरायला जाऊन आल्यानंतर आपल्या पत्नीला आयटीआय मध्ये जातो असे सांगून सकाळी 7 वाजता निघून गेल्यानंतर प्रवीण हा सावली तालुक्यातील बोथली ते पांढरसरड रोडवर हनुमान मंदिराजवळ त्याने तन नाशक विषारी औषध घेतल्यानंतर आपल्याच आयटीआय मधील विद्यार्थी याला मोबाईलवर कॉल करून पूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवीणला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी

9-30 ला जिल्हा रुग्णालय दाखल केल्यानंतर बारा ते सव्वा बाराच्या सुमारास प्रवीण चा मृत्यू झाला. असे डॉक्टरांनी घोषित केले.

 

प्रवीणला आयटीआय मधील कामाचा जास्त व्याप असल्याने कंटाळून त्याने आत्महत्या केली असेच सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रवीण यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्या मागे पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आहे. आयटीआय मध्ये दोन लिपकाची कामे प्रवीण करायचा सुट्टीच्या दिवशी पण ऑफिसमध्ये जायचं याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असे प्रयत्न निर्माण झालेले आहे. प्रवीणला योग्य ते न्याय देण्यात यावे ही सावली करांची मागणी आहे.