
🪔👑🌜🥡🏵️🎨🏠🏮

पाथरी (नितीन अढिया )▪️आज दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला *जि.प.उच्च प्राथ.शाळा, पाथरी पं.स.सावली जि.चंद्रपूर* येथे कौशल्यधिष्टीत उपक्रम अंतर्गत विद्यार्थी निर्मित साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले ▪️विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने प्रेरित सदर प्रदर्शनात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ▪️
थर्माकोलची घरे, आकाशदिवे, पायदान, किल्यांची प्रतिकृती, विज्ञान साहित्य, गणित साहित्य,विविध अवजारे, विविध कलात्मक प्रतिकृती, सजावट साहित्य, तंत्रज्ञान आधारित साहित्य इ. साहित्याची प्रदर्शनात रेलचेल होती.▪️स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नवनवीन वस्तू, कल्पना, संकल्पना यांच्या मूर्त प्रतिमा विद्यार्थी मनावर कोरल्या गेल्या▪️ ‘स्पर्धेचा वार_शनिवार’ अंतर्गत सदर प्रदर्शनी मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.▪️प्रदर्शनीचे उद्घाटक संध्याताई सडमाके सदस्य शा.व्य.समिती
▪️अध्यक्ष- मा. श्री जे.बी.वाढई मुख्याध्यापक
▪️प्रमुख पाहुणे- सर्व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्राम पंचायत पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
▪️संचालन- श्री संतोष सिडाम
▪️प्रास्ताविक- श्री योगेश पवार
▪️मार्गदर्शन- श्री धारगावे सर
▪️आभार- श्री बोरकर सर
▪️सहकार्य- सर्वश्री शिक्षकवृंद श्री वेठे सर, श्री आळे सर, बोन्द्रे सर, श्री लोनबले सर, बडोले मॅडम, विखार मॅडम तथा
▪️शालेय बालमंत्रालय, जि.प.उच्च प्राथ.शाळा, पाथरी पं.स.सावली जि.चंद्रपूर
