सिंदेवाही तालूका बेलदार समाज महिला कार्यकारीणी सभा संपन्न…

51

 

सिंदेवाही(प्रतिनिधी)
दिनांक 12.11.2023
विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर जिल्हा शाखा चंद्रपुर चे विद्यमाने 21 व 22 जानेवारी2023 ला नियोजीत राज्य स्तरीय अधिवेशन सांस्कृतिक स्पर्धा व उप वधू-वर परिचय मेळावा प्रचार प्रसार नियोजन बैठक सिंदेवाही तालूका सभेत समाजाचे सहभाग योगदान बाबत प्रचार व प्रसार सभा सिंदेवाही येथील नानाजी ईरटवार यांचे राहते घरी सौ .मयुरी नन्नेवार व सौ.वैशाली ईरटवार,सौ.कल्याणी मुप्पीडवार, सौ.अमृता महाजनवार यांचे नियोजनात सौ.आरती अ.अंकलवार सचिव चंद्रपुर शहर महिला कार्यकारीणी यांचे अध्यक्षतेत सौ.निकिता कन्नमवार, सौ मनिषा (नागमणी) कन्नमवार, सौ.दिपाली बंडिवार क्रमशः उपाध्यक्षा चंद्रपुर शहर .यांचे मार्गदर्शनात येथील सक्रीय महिला श्रीमती शितल ईरटवार सौ वर्षाताई मुप्पीडवार सौ.कोमल गूज्जनवार श्रीमती मंगला ननेवार सह बहूसंखयेने महिलांचे उपस्थितीत पाहुण्यांचे स्वागत करून सभेचे सुरूवात झाले.

त्यानंतर विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर जिल्हा शाखा चंद्रपुर ता चंद्रपुर विद्यमाने नियोजित 21 व 22 जानेवारी2023 ला होणारे राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा व वधू -वर परिचय मेळावा व राज्य स्तरीय अधिवेशन संदर्भांत सविस्तर चर्चा करून माहीती देण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील समाज बांधव बहूसंखयेने सहभागी होण्याचे ठरविले .
या पहिले झालेले पुरूषांचे सभेत सिंदेवाही तालूका अध्यक्ष (पुरूष ) पदावर श्री.अभिजीत मुप्पीडवार यांचे सर्वानुमते निवड करण्यात आलेले आहे.

दिनांक 12.11.22 रोज शनिवारला महिला कार्यकारीणी गठीत करण्यासाठी चर्चा करण्यात आले सिंदेवाही तालूका महिला अध्यक्ष व महिला कार्यकारीणी यांचे निवड करून जाहीर करण्याचे अधिकार सौ.प्रणाली ईरटवार अध्यक्ष व सौ रागीणी गोरलाॅवार सचिव यांना देण्यात आले. याप्रसंगी सौ.संगीता ईरटवार सौ.ज्योती नलावार सौ. पूजा जट्टलवार सौ कोमल गुज्जनवार सौ.सावित्री जट्टलवार सभेचे संचलन सौ.कालिंदी रेगुलवार संचलन केले तर सौ. वैशाली
इरटवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.