
नागपूर //नरखेड : – ( गांधी बोरकर ) महाराष्ट्र शासनाने कोटीवधी रुपये खर्च करून नरखेड येथे ग्रामीण रुग्णालय उभारले.त्याच्या सोबतच नरखेड तहसील मध्ये ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.मात्र तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता व याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांसाठी रेफर सेंटरच बनले आहे.
नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. नागपूर , अमरावती , वरुड , सावनेर , येथे जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये हा उद्देश ठेवून शासनाने सन १९८३ मध्ये कोटी रुपये खर्च करून अद्ययावत प्रशस्त इमारत उभारण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी मंजुरी देण्यात आली. रुग्णांसाठी अद्ययावत यंत्र सामग्री दिली. पण हे सर्व मृगजळच ठरले. नरखेड येथील वैद्यकीय अधिकारी साधे एम बी बी एस , डॉक्टर आहे . या नरखेड ग्रामीण रुग्णालयात , स्त्री रोग तज्ज्ञ , हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, भूलतज्ज्ञ, तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत . हे रुग्णालय ३० बेडचे आहे. मात्र येथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हे नरखेड रुग्णालय ओपीडीवर चालले आहे. येथे सोनोग्राफी करण्याची यंत्रणा नाही . शिवाय बालकांना ठेवण्यासाठी जी काचेची पेटी असती ती देखील नाही . मृत्यूकाचे शवविच्छेदन करण्यासाठी येथे एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.काही वेळा बाहेरील व्यक्ती बोलावून शवविच्छेदन करावे लागते. याचा भुर्दंड मयताच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. सर्जन आणि हृदयरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ , बाल रोग तज्ज्ञ यांची कमतरता असल्यामुळे अचानक कधी मोठा अपघात झालं तर एक ते दोन डॉक्टर असल्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडते. अशा वेळी गंभीर रुग्णांना बाहेरचे हॉस्पिटला रेफर केले जाते. पूर्वीपासून आसपासच्या खेड्यातील लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन गृह आहे. याशिवाय अनेक वर्षांपासून येथील क्ष किरण गृह सुरु आहे. नरखेड हे तालुक्यात केंद्रस्थानी असलेले शहर आहे. हे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. यामुळे या ठिकाणी रूग्णालयात बाळंतपण करून घेण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र स्त्री रोग तज्ज्ञ या रिक्त पदामुळे भौतिकदृष्टया सुसज्ज असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. साथजन्य आजारांचा उद्रेक झाल्यास सर्व औषधे पुरेशा प्रमाणात आहेत. श्वान दंश औषधांचा पुरेसा साठा आहे. असे असतांना रिकामे असणारे रुग्णालय बरेचसे प्रश्न उपस्थित करत असून त्यांची दाखल आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना सरकारी वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा. या ठिकाणी रोज ३५ ते ४० ओपीडी संख्या आहे़. बुधवारी मात्र ८०च्या घरात ओपीडीची संख्या असते. या बाबीकडे आरोग्यमंत्री मा तानाजी सावंत याचे लक्ष वेधण्यासाठी उदयन बनसोड , पप्पू महंत , पंकज क्षिरसागर , आकाश जवादे , यांनी दिनांक १० ला मुबई येथे मंत्र्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
