आताची ब्रेकिंग न्यूज….. राष्ट्रीय महामार्गावर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार

106

 

काही वेळापूर्वीच केशव शिवराम झरकर यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सावली तालुक्यातील हिरापूर येथील केशव शिवराम झरकर वय 50वर्ष यांचा मुल- गडचिरोली हाय वे मार्गावर फळरोप वाटिका हिरापूर/व्याहाड खुर्द च्या गट समोर आज दिनांक 12/11/2022 ला सायं.६:४५ वाजता एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला.

त्यात गंभीर जखमी केशव झरकर यांनां जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेत असतांना वैनगंगा नदीच्या पुलावर गाडीमध्येच निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सद्या या महामार्गावर रोजच अपघाताच्या घटना होत असल्याचे दिसत असून वाहने हळू चालवावी असे आवाहन सावली चे ठाणेदार आशिष बोरकर यांनी केले आहे.