
सावली तालुक्यातील बोथली येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजेने अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. चंद्रपूर चे अधिकारातून जलशुद्धीकरण संयंत्र बसविण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरु झाले परंतु आजतागायत सदर संयंत्र सुरु झालेले नाही.

सदर मशिनरीवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे मशिनरी धूळ खात पडलेल्या आहेत आंम्ही सर्व ग्रामस्थ आतुरतेने शुद्ध पाणी मिळावे यास्तव प्रतीक्षेत आहेत.परंतु जल शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आलेल्या विहिरीची योग्य रीतीने सफाई करण्यात आलेली नाही .गावात पिणाच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.
तात्काळ विहिरीची १००% सफाई करून जल शुद्धीकरण संयंत्र सुरु करण्यात यावे असे
निवेदन ताराचंद खोब्रागडे ,निलेश पुटकमवार ,प्रतिक दुर्गे ,राहुल मुठ्ठावार ,अभिषेक दुर्गे यांनी बीडीओ सुनीता मरस्कोल्हे यांना दिले.
