चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अपघातात शिक्षक ठार

188

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली तालुक्यातील मोखाळा च्या पेट्रोल पंप समोर आज रात्रौ 8 च्या दरम्यान अज्ञात चार चाकी वाहनाने पायदळ असलेल्या नवभारत विद्यालय व्याहड बूज चे शिक्षक किशोर महादेव झोडे यांनां जोरदार धडक दिली त्यात शिक्षक झोडे हे जागीच ठार झाले.
सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटनास्थळी पोहचून झोडे यांचे शव सावली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.पोलीस पुढील तपास करीत आहे.