स्वतःच्या साडीने गळफास घेऊन महीलेची आत्महत्या सावली तालुक्यातील घटना

244

 

सावली (सौरव गोहणे)
:-  तालुक्यातील भट्टीजांब जंगल परीसरात मनोरुग्ण महीलेने स्वतः च्या नेसलेल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३.३३वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सुमीत्रा मंगेश चरडूके २७ असे मृत महिलेचे नाव आहे. सुमारे दोन तीन महीन्यापासुन ती भट्टीजांब येथे आपल्या माहेरी आली होती. २ नोव्हेंबर पासुन माहेरहून बेपत्ता होती. सर्वत्र शोधाशोध सुरू असतानाच आज दुपारच्या सुमारास जंगल परीसरातील एका झाडाला स्वतःच्या नेसलेल्या साडीने गळफास लावलेल्या अवस्थेत गुराख्याला आढळून आली.

या संदर्भात सावली पोलीसांना माहीती देण्यात आली असुन उत्तरीय तपासणी करीता मृतदेह सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत. मृतक महीलेच्या पश्चात दोन मुले, पती आहे. तीचे लग्न मुल तालुक्यातील बोंडाळा येथे झाले होते.