Home
HomeBreaking Newsमदमाशाच्या हल्यात शेतकरी ठार ;सावली तालुक्यातील घटना

मदमाशाच्या हल्यात शेतकरी ठार ;सावली तालुक्यातील घटना

 

सावली (सौरभ गोहणे)
मदमाशाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना दिनांक 6 ला घडली असून किसन डोनूनी चिमलवार ७५ वर्ष असे मुतकाचे नाव आहे.

सावली तालुक्यातील भारपायली येथील रहिवाशी शेतकरी किसन चिमलवार सध्या धान पिक हाती आल्यानतर ऐन कापनिच्या मोसमात वन्य जीव रानटी डुकराचा हौदोस सुरु आहे.

तालुक्यातील बहुतांश शेतजमीनी जंगल भागा लगत असल्याने हाती आलेल्या धान पिकाची पाहणी करण्यासाठी शेतकरी सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त शेतात धान पिकाची रखवाली करत असतात घटनेच्या दिवशी मृतक शनिवार रोजी नेहमी सारखा सकाळी १० वाजताच्या सुमारास शेताकडे गेला परन्तु उशिरा पर्यन्त घरी परतला नाही.

त्यामुळे घरच्यानी शोध मोहिम सुरु केलि मृतकाच्या शेत जमीनी लगत काही वृक्षावर मदमाशाचे वास्तव्य होते परिणामी आपल्या शेतात असलेल्या मृतकावर शेतात गेल्यावर हल्ला चढ़विला त्यात मृतक गंभीर जख्मी झाला आणि जख्मी अवस्थेत शेती बाधावर पडून राहीला घरच्याच्या शोध मोहिमे अंतर्गत शनिवारी रात्रीच्या ८ वाजताच्या सुमारात जख्मी अवस्थेत मिळाला लागलीच त्याला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले परन्तु मृतकाच्या शरीरावर मदमाश्याचे अनेक घाव असल्याने झालेली शरीरावर विषबाधे मुळे प्रकृति चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ गडचिरिली येथील सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले.

मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला मृतकाच्या पश्च्यात पत्नी तीन मूली असा आप्त परिवार असून मृतकाच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे .

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !