
विरुर स्टेशन(तिरुपती नल्लाला)-
रात्री शेतात जागली गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत सुब्बई नियतवणात घडली आहे भीमा घोगलोत वय 55 वर्ष असे मृत शेतकर्याचे नाव आहे.

थोमापूर येथील भीमा घोगलोत नेहमीप्रमाणे शेतात पीक संरक्षणासाठी जागली गेला शेतातील मचानवर असतानाच बिबट्याने हल्ला करून त्याला लांब पर्यंत फरफटत नेले ओरडण्याचा आवाजाने इतर शेतकऱयांनी धाव घेऊन पाहले असता बिबट त्यास ओढून नेत होता परंतु काही करू शकले नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता लगेच वनकर्मचार्याना माहिती देण्यात आली माहिती मिळताच सुब्बई, चिंचोली,अंतरगाव चे वनरक्षक आणि इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले असून मोका पंचनामा सुरू आहे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार,क्षेत्र सहायक सुरेश मांदाडे विरुरचे ठाणेदार राहुल चव्हाण आणि पोलीस कर्मचारीही घटनास्थळी पोहचले असून नागरिकही मोठ्या संख्येत गर्दी केली आहे.
दोन वर्षांनंतर वाघाचे या क्षेत्रात पुन्हा हल्ले वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण झाले आहे शेतीची जागरण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे