
सावली(सौरव गोहणे)

सावली शहरातील दैनंदिन कचरा संकलनाची घंटा गाडी मागील दोन दिवसा पासून बंद आहे. त्यामुळे सावली नगरात घनकचऱ्याची समस्या निर्माण होऊन सावली करांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित कंत्राटदार चे चार महिन्यापासून बिल नगर पंचायत ने अदा न केल्याने कचरा संकलनाचे काम बंद आहे अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नगरातील कचरा संकलनाचे काम थांबले आहे.
मात्र अशा गंभीर बाबीकडे सावली नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आज केर कचरा घरोघरी सर्वांच्या डब्यात असून तो आता आरोग्यासाठी हानी होणार आहे. मात्र याकडे मुख्यधिकारी व पदाधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्याने सावलीवासीयांना याचा नाहक त्रास सहन लागणार आहे. येत्या सोमवार पर्यँत कचरा संकलनाचा तोडगा न निघाल्यास नगरपंचायत मधेच कचरा फेको आंदोलन करू असा इशारा विरोधी पक्ष नेते तथा भाजपा गट नेते नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी सावली नगरपंचायत ला इशारा दिला आहे.