सावली पोलिसांनी पकडले जनावरे चे अवैध वाहतूक होणारे ट्रक

68

 

 

आज दि.०३/११/२२ रोजी पहाटे दरम्यान चामोर्शी ते मुल मार्गावरून अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशी गोपनीय माहीती प्राप्त झाली. त्यावरून हरणघाट येथे अचानक नाकाबंदी लावून वाहने चेक केली असता सकाळी अंदाजे ०५:३० च्या सुमारास चामोर्शी दिशेकडून येणारे दोन आयशर ट्रक एकामागोमाग एक दुर थांबले.

पोलीसांची नाकाबंदी पाहून दोन्ही ट्रकचे चालक व क्लीनर त्यांचे ट्रक जागीच सोडून पळून गेले. दोन्ही ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये दोन्ही मिळून लहानमोठे एकूण ४१ गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने, कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले. दोन्ही ट्रकमधील मिळून ४९ गोवंश जनावरे कींमत अं ४,१०,००० रू दोन आयशर कंपनीचे ट्रक क MH 34 BZ 0237 व MH 34 BZ3609 कींमत अं३०,००,००० रू असा एकूण ३४,१०,००० रू चा माल जप्त करण्यात आला. सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आली.

सदर गुन्हयातील अज्ञात चार फरार आरोपी यांचेविरूद्व महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट पोलीस अधिनियम तसेच मोटरवाहन अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री रविंद्र परदेशी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, धिरज पिदुरकर, स्वप्नील दुर्योधन, दिपक चव्हाण यांनी केली.