बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या सावली तालुका प्रमुख पदी कैलास कापगते यांची निवड

92

 

सावली येथील सामाजिक कार्यात नेहमी सहभागी घेणारे तसेच विविध प्रसंगी सर्वांना सहकार्य करणारे युवा नेतृत्व कैलास कापगते यांची शिवसेना पक्ष नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे आदेशानुसार व पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरणजी पांडव यांचे सुचनेवरुन सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे, जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी सावली तालुका प्रमुख या पदावर नियुक्ति केली आहे.

शिवसेना पक्षाच्या पदाचा वापर संघटन वाढीसाठी करुन जन – सामन्यांना न्याय देण्याचे कराल अशी अपेक्षा कापगते यांच्या कडून करण्यात आली आहे.

 

नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात कैलास कापगते यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. कैलास कापगते यांच्या नियुक्ती बद्दल सावली तालुक्यातील युवकांनी आनंद व्यक्त केला आहे.