ओढणी दुचाकीच्या चाकात अडकल्याने महिलेचा खाली पडून मृत्यू !

205

आलापल्ली(प्रतिनिधी)

चौडमपल्ली येथील मातेचे दर्शन घेतल्यानंतर गावाकडे परत जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघात दुचाकीवरील महिलेची ओढणी ही मोटर सायकल च्या चाकात अडकली आणि ती पडली व जबर मार लागल्याने ती ठार झाली. पद्मा नरेश बोम्मावार (३०, रा. आलापल्ली) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर अपघात आष्टी आलापल्ली मार्गावरील बोरी येथे रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमुळे पद्माचे देवदर्शन हे जीवनातील अखेरचे दर्शन ठरले.

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवाशी नरेश गोकुलदास बोम्मावार व पत्नी पद्मा नरेश बोम्मावार हे चौडमपल्ली येथील मातेच्या दर्शनासाठी सकाळी निघाले. तेथून परत येताना सकाळी ७ वाजता पद्मा बोम्मावार यांची ओढणी मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने ती पडली. डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद अहेरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस कर्मचारी पी. एन. वाघाडे करीत आहेत. पद्माला मुलगा, मुलगी असून तिचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता.

या अपघाताची माहीती होताच सर्वत्र शोककळा पसरली.शेकडो जण त्यांच्या निवासस्थानी जमा झाले.सायंकाळी 6 वाजता पद्मा वर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी व्यापारी मंडळी,पद्मशाली समाज व इतर समाज बांधव,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शोकसभा घेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.