वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी….

74

 

शेत जमीन परिसरालगत आपली स्वताची जनावरे राखन करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

खुशाल कवडू शेट्टे ५० वर्ष असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून तो उपरी येथील रहिवाशी होता उपवनक्षेत्र व्याहाड अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात झुड़पी जंगल असल्याने या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरात असल्याने सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत निर्माण होत आहे.

त्यामुळे या भागात शेतकरी तशेच अनेकात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दिवशी जखमी शेतकरी खुशाल शेट्टे आपली जनावरे गाई ; मशी चराईसाठी बांध तलाव कडे जानाऱ्या जंगल परिसरातील कक्ष क्र.१९८ लगत चराई करीत असताना या भागात दब्बा धरून असलेल्या वाघाने मशी वर हल्ला केला.

चावताळलेल्या मशीने इतरत्र धाव घेतली परिणामी गाई म्हशी राखणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने झड़प घेतली जखमी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला व लगतच सदर परिसरात काही महिला पुरुष सर्पनाकरिता गेले असता जखमी शेतकऱ्याची ओरङ पाहून त्या ठिकाणी धाव घेतले.

आणि लगेचच जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले सदर जखमी शेतक ऱ्याला शरीरावर्ती अनेक जखमा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या भागात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या तर धान पिकाचा हंगाम हाती येत असताना सर्वत्र शेतकरी आपल्या शेतावर असतात त्यामुळे आपला जीव मुठित घेऊन काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण होत आहे या भागातील वन्यजीवांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता उपक्षेत्रा अंतर्गत ऊपरी येथील वनरक्षक यांनी जखमी शेतकऱ्याला भेट देऊन विचारणा केली.