
सावली(सौरव गोहणे)
सावली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मृत देह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली.

सावली तालुक्यातील बोथली येथील रोहित अशोक दळाजे वय 20 वर्ष या युवकाने उंदीर मारण्याची औषध 27तारखेला प्राशन केले असल्याचे घरच्या लोकांना माहित होताच त्याला बोथली वरून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारासाठी आणण्यात आले होते.
मात्र सावली येथे प्राथमिक उपचार करून सामान्य रुग्णालय गडचिरोलीला रेफर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं असता त्याला रेफर करण्याकरिता ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली. व त्याला त्याच्या घरच्यांनी ऍम्ब्युलन्स मध्ये बसवत असतांना त्याने आपल्या वडिलांच्या हाताला झटका मारून रुग्णालयाच्या परिसरातून फरार झाल्यामुळे सर्वत्र त्याचा शोधाशोध करण्यात आला.
शेवटी तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात 29/10 ला रात्रौ 11:30 वाजताच्या सुमारास रोहित चा मृतदेह आढळला असता वरील घटना पोलीस विभागाला माहीत होताच सावली पोलीसांनी उच्च स्तरिय तपासणी करिता मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येते पाठवण्यात आले.
या घटनेची पुढील तपास 174crpc अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सावली पोलीस करीत आहे.