गोंडवाना गोटुल चांदागड येथे श्रद्धाजंली अर्पण समारोह संपन्न

66

चंद्रपूर :— (गांधी बोरकर) इ.स.२ १
अॅाक्टोबर १८५८ ला महान क्रांतीवीर शहीद बाबूराव पुलेसूर शेडमाके यांना जुलमी इंग्रज सत्तेने चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कारागृह परिसरात असलेल्या विशाल वृक्षाला लटकवून फासी दिली. त्यामुळे या दिवसी गोंडियन,आदिवासी समाजबांधव , लोकप्रतिनिधी, महिला पुरूष हजारोच्या संख्येने पिवळा गणवेश परिधान करून या परीसराला भेट देऊन शहीदभूमीवर नतमस्तक होतात.
या शहीद दिनाचे अैाचित साधून *गोंडवाना गोटुल मुल रोड चंद्रपूर* येथे *श्रध्दा सूमन अर्पण समारोह*..
घेण्यात आला.

*यामध्ये अध्यक्ष स्थान तिरू.आनंद मडावी,मुर्सेनाल तुमसर,यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, प्रा. मधुकरराव उईके,केंद्रिय अध्यक्ष,अॅाल इंडिया आदिवासी कर्मचारी संघटना), हरिशभाऊ उईके ,प्रदेश अध्यक्ष,गोंडवाना गणतंत्र पार्टी, पी.एल.खंडाते , डॅा.शारदा प्रविण येरमे मॅडम, कोकीळाताई पेंद्राम,मोहनसिंग मडावी, मनोजसिंग आत्राम मुर्सेनाल, प्रा.शांताराम उईके, सुधाकर कन्नाके , बापूजी मडावी, विजयसिंह मडावी आदिची उपस्थिती होती*…

गोटुल परिसरातील शहीद वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते श्रध्दा सूमन ‌अर्पण करण्यात आले व त्यानंतर शहीद विरगाथा वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मांडल्या. कार्यक्रमात पाहूण्यांच्या हस्ते *जंगोम* या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.शिवाय बाबूराव शेडमाके यांच्या विरगाथांचा परिचय गोंडी गित व नृत्यांमधून करून देण्यात आला.
यावेळी प्रबोधन करतांना प्रा. मधुकर उईके यांनी समाजाकरीता कोण-कोणत्या न्यायालयामध्ये न्यायीक लढे सुरू आहेत याविषयी सविस्तर माहीती उपस्थित जन-समुदयाला संबोधन करतांना सांगितले.डॅा शारदा येरमे यांनी गोंडियन महिला आपल्या अज्ञानामूळे आपल्या आरोग्यकडे कसे दुर्लक्ष करतात याबाबत जाणीव करून दिली.हरिशभाऊ उईके यांनी राजकिय क्षेत्रा बाबत मार्गदर्शन केले,कोकीळाताई पेंद्राम, मनोजसिह मडावी, सुधाकर कन्नाके , मोहनसिंग मडावी ,विरेंद्रशहा आत्राम , प्रा.शांताराम उईके यांनी मैालीक मार्गदर्शन करून उपस्थित समाज बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आपल्या प्रभावी अध्यक्षीय मार्गदर्शनात तिरू. आनंदराव मडावी यांनी समाजातील आजची वास्तव स्थिती मांडली.
*गोटुल परीसरात येणा-या सर्व सगांना उत्कृष्ट भोजन देण्याची महत्वाची भुमिका चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस विभागात कार्य करणा-या पोलीस ,अधिकारी ,कर्मचारी यांनी पार पाडली यामध्ये विकास जुमनाके,मिलींद नैताम, विकास आलाम, अशोक मरस्कोल्हे आदी च्या नेतृत्वात या कार्याला समर्थपणे पूर्ण केले*

 

*कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सोमाजी काटलाम, माणिक सोयाम,निहालसिंग कुळसंगे,रामभाऊजी मडावी, प्रमोद इरपाते,सुरेश तोरे सर , मुकेश सुरपाम ,गोपाळराव मसराम,बाबा मंगाम,सुभाष कोवे, विठ्ठल नैताम, विजय परचाके,मारोती पेंदाम, रामू मेश्राम, सुनिल तलांडे ,सागर मडावी बंडु कुडमते, दामोदर खंडाते,शितल उईके, प्रमोद कोवे, राजु कुमरे तथा व्यवस्थापन व आयोजन समितीतील मातृशक्ती पदाधिकारी तथा तालुकापातळीवर नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी विशेष प्रयेत्न केला*
*कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन संजय मेश्राम , सुरेश मसराम यांनी केले तर आभार प्रदर्शन शहीद वीर बाबूराव शेडमाके बहुउद्देशिय संस्थेचे व आयोजन -व्यवस्थापन समितीचे सचिव माणिकराव सोयाम यांनी केले*….