
राजुरा,प्रतिनिधी
बल्हारशाह ते काझीपेट जाणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर चनाखा गावाजवळील कक्ष क्रमांक 158 मध्ये रेल्वेच्या धडक बसल्याने वाघ ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चुनाला नियतवनक्षेत्र मधून गेलेल्या रेल्वे रुळाची रेल्वे गँगमन नेहमी प्रमाणे सकाळी गस्त करीत असताना कक्ष क्रमांक 158 मध्ये रेल्वेच्या धडकेत वाघ ठार झाल्याचे आढळून आले लगेच त्यांनी राजुरा वन विभागास याची माहिती दिली माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड ,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक देवाजी शेंडे,आणि वनमजुर घटनास्थळी पोहचले मोका पाहणी नुसार पहाटेच्या वेळीस रस्ता ओलांडताना रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज वन कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे
सदर वाघ मादी असून अंदाजे चार वर्षांची असावी घटनास्थळी उपवनसरक्षक श्वेता बोड्डू ,उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल,यांनीही भेट दिली असून पुढील कारवाई सुरू आहे
शवविच्छेदन करून मांसाचे तुकडे फॉरेन्सिक लॅब पाठविण्यात येणार आहे रेल्वेच्या धडकेत वाघ व इतर वन्यप्राणी नेहमीच मृत्युमुखी पडत आहे याची वनविभागांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी संघटनेने केली आहे
