सातारा कोमटी नियतवनक्षेत्रात वाघाचा मृत्यू

46

राजुरा,प्रतिनिधी

आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी . बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र . 439 मध्ये सामुहीक गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आले .
सदर वाघ नर असुन वय अंदाजे 3 वर्ष इतके आहे . वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षित आहेत माहिती मिळताच वनकर्मचारीनी वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती देऊन मोकावर पोहचून पंचनामा केला . सदर वाघाचे शवविच्छेदन पशुधन अधिकारी डॉ . डी . पी . जांभुळे , व डॉ . कुंदन पोडचलवार ,उपवनसरक्षक श्वेता बोड्डु ,. बंडु धोत्रे ,. मुकेश भांदककर , वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे उपस्थितीत पार पाडले . शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले . सदर नमुने परिक्षणाकरीता रासायनिक विश्लेषक , जिल्हा न्यायसहाय्यक , वैद्यकिय प्रयोगशाळा नागपुर येथे पाठविण्यात येणार आहे . शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे कारण सांगता येईल . सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपवनसरक्षक श्वेता बोड्ड ,सहायक वनसंरक्षक . श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे ,करीत आहे .
सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्रसाहायक अब्बास पठाण , वनरक्षक प्रशांत धांडे , ज्योती अटेल व पायल शेडमाके यांनी सहकार्य केले .