
सावली(सूरज बोम्मावार) चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथील महात्मा फुले चौका समोर चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या ट्रक mh49 1127 ने आपल्या नातेवाईक ला भेटून स्वगावाकडे जाणाऱ्या शिर्शी येथील उपसरपंच दादाजी किंहेकार यांचा मुलगा बबलू व आई लक्ष्मी बाई हे येत असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्यांना मागून जोरदार धडक दिली व त्यांना चिरडून ट्रक पुढे घेऊन गेले. मुख्यमार्गावरील पोलीस स्टेशन च्या परिसरात ट्रक सोडून ट्रक चालक फरार झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे त्वरित घटनास्थळी दाखल होत अपघातातील दोघांना पोलीस वाहनाने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची माहिती होताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.सदर घटनास्थळी पोलीस असून रुग्णालयातही गर्दी वाढत आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे.
सावली तालुक्यातील शिर्शी येथे किन्हेकार हा कुटुंब मोठा परिवार आहे.त्यातच दादाजी किन्हेकार हे माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान उपसरपंच आहे.त्यातच त्यांचा दुसरा मुलगा बबलू हा अतिशय चांगला व गुणी मुलगा होता.तसेच आई लक्ष्मीबाई या सुद्धा प्रेमळ स्वभावाच्या होत्या.ते नातेवाईक यांना भेटून गावाकडे परत जात असतानाच त्यांचा असा अपघाती निधन झाल्याची माहिती होताच सर्वत्र शोककळा पसरली असून सावली तालुका या नातू-आजी च्या अपघाती निधनाने गहिवरला आहे.यांच्या वर दिनांक 19 ला शिर्शी येथे अंत्यसंस्कार केल्या जाणार आहे.
