आत्ताची ब्रेकिंग न्यूज…… सावलीत ट्रक ने दुचाकी स्वारास चिरडले….2 जण जागीच ठार

144

 

सावली(सूरज बोम्मावार) चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथील महात्मा फुले चौका समोर चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या ट्रक mh49 1127 ने आपल्या नातेवाईक ला भेटून स्वगावाकडे जाणाऱ्या शिर्शी येथील उपसरपंच दादाजी किंहेकार यांचा मुलगा व आई हे जात असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली व त्यांना चिरडून ट्रक पुढे घेऊन गेले व पोलीस स्टेशन च्या परिसरात ट्रक सोडून ट्रक चालक फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे त्वरित घटनास्थळी दाखल होत अपघातातील दोघांना पोलीस वाहनाने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

अपघाताची माहिती होताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.सदर घटनास्थळी पोलीस असून रुग्णालयातही गर्दी वाढत आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे.या घटनेतील मृतकांची नावे वृत्त लिहेपर्यंत योग्य कडू शकली नाही.