
सावली – मी आय ए एस अधिकारी होणारच या उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेडी आणि ग्रामपंचायत खेडी च्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन गावस्तरावर करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण व मार्गदर्शन कार्यक्रम गावात घेण्यात आला.

स्पर्धा परीक्षेचे वातावरण गावात निर्माण व्हावे या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि मार्गदर्शन व बक्षीस वितरण गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती विजय कोरेवार, सरपंच सचिन काटपल्लिवार, उपसरपंच गरतुलवार, शाळा समिती अध्यक्ष अनिल माचेवार तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात गावातील सर्व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाच्या रुपात एमपीएससी स्तरावरील पुस्तके आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. पदवीधर गटातून प्रथम बक्षीस तिरुपती मर्लावार, द्वितीय अक्षय मर्लावार, तृतीय कार्तिक गर्कावार, इयत्ता ९ ते १२ या गटातून प्रथम वेदांत म्यानावार, द्वितीय पियूष दुधे, तृतीय ऋतुजा कोरेवार आणि इयत्ता ५ ते ८ या गटातून प्रथम मानसी कोरेवार , द्वितीय वैष्णवी अन्नावार, तृतीय आचल राऊत यांनी पटकाविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्यध्यापक नवनीत कंदालवार, शिक्षक नंदकिशोर नंदनवार, सुमित्रा कुमरे , सुमित देवगडे, उराडे तसेच शिक्षणप्रेमी प्रतीक तुंगिडवार, ग्रामसेवक विपीन वाकडे व गावकऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रतन कंचावार आणि प्रांजली दंडावार यांनी केले तर आभार सुमित देवगडे यांनी मानले.
