
सावली(सौरव गोहणे)

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन तीन दिवसीय इंद्रधनुष्य कला व सांस्कृतिक महोत्सव पार पडला यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाने विविध स्पर्धेत सहभाग घेऊन कलाविष्कार केला लोकनृत्य, प्रहसन व मुकनाट्य या सामूहिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला यामध्ये पूजा भोयर, रोहिणी शेरकी, भाग्यश्री राऊत, पोर्णिमा कोरडे, निशा राऊत, मंगेश पिट्टलवार, संकेत दुधे, भोजराज ढोले, साहिल शेंडे, कुणाल नायबनकर, गोपीचंद निकोडे, पायल मेश्राम, हे विद्यार्थी सहभागी होते. तसेच स्थळचित्र व पोस्टर मेकिंग या स्पर्धेमध्ये अभिषेक साखरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
पाश्चिमात्यगायन यामध्ये रोहीणी शिरेकी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. शास्त्रीय तालवाद्य या स्पर्धेमध्ये संतोषी बत्तुलवार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच स्थळछायाचित्रण यामध्ये खिनेश गोवर्धन याने तृतीय क्रमांक प्राप्त केला पाच कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयांने आपली विजयी मोहोर उमटवली लोकनृत्य, प्रहसन आणि मूकनाट्य या स्पर्धेमधील प्रशिक्षक म्हणून अंतबोध बोरकर यांचे सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोबरागडे यांचे मार्गदर्शन सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.स्मिता राऊत ,डॉ. किरण कापगते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. प्रफुल वैराळे यांच्या समन्वयन विद्यार्थीच्या कलागुणांनी या आंतर महाविद्यालयीन संस्कृतिक सांस्कृतिक महोत्सव मध्ये आठ बक्षीस प्राप्त करुन विजयी मोहोर उमटवली.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, उपाध्यक्ष अनिल स्वामी, सचिव बाळापाटील संगिडवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
