मनसेचा राजस्थान मध्यप्रदेश प्रांतातील ट्रॅक्टर्स चालक मालकांना इशारा.

34

चंद्रपूर :- ( गांधी बोरकर )

वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी हे ट्रॅक्टर सह (हडम्बे) सोयाबीन चणा काढणी यंत्र दरवर्षी आणतात व त्यांचा मुक्काम हा गावागावात असतो, दरम्यान त्यांच्या माध्यमातून गावातील मुली व महिलांची छेड काढणे, त्यांना पळवणे व त्यांची राजस्थान मधे विक्री करणे, स्थानिक ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांच्या घरी चोऱ्या करणे इत्यादी प्रकार होतं असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय ट्रॅक्टर्स मालक व त्यावर काम करणाऱ्या कामगारांचे पोलीस सत्यापन करून त्यांच्या वाहनांची तपासणी करा व त्यांच्या बेकायदेशीर कामामुळे त्यांच्यावर प्रतिबंध लावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,जिल्हा सचिव विनोद सोनटक्के व वरोरा तालुक्यातील स्थानिक मराठी ट्रॅक्टर्स धारक उपस्थित होते.

स्थानिक वरोरा, भद्रावती या तालुक्यात जवळपास 300 पेक्षा जास्त युवा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्स व त्यासोबत हडम्बे(पीक काढणी यंत्र) कर्ज काढून घेतले आहे पण राजस्थान व मध्यप्रदेश प्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स मुळे त्यांना ऐन पीक काढण्याच्या मोसमात कमी काम मिळते पर्यायाने ते बैंकेचे कर्ज भरू शकत नाही. अगोदरच कर्जात बुडालेला शेतकरी मग हवालदिल होऊन आत्महत्या सारखा पर्याय निवडतो, त्यामुळे स्थानिक बेरोजगार शेतकरी युवकांचा हक्काचा रोजगार परप्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स व हडम्बे धारक हिसकावून घेत असल्याने त्यांच्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे झाले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परप्रांतातून येणाऱ्या लोकांची ट्रॅक्टर्स हे राजस्थान व मध्यप्रदेश पासिंग ची असतात व त्यांना महाराष्ट्रात यायचे असेल व ट्रॅक्टर्स चालवायचे असेल तर स्थानिक जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयातून त्यांच्या ट्रॅक्टर्सची तात्पुरती पासिंग करणे गरजेचे असते, शिवाय स्टेट मायग्रेशन एक्ट नुसार कुठल्याही प्रांतातील व्यक्तिने दुसऱ्या प्रांतात जातांना स्थानिक पोलीस स्टेशन मधे स्वतःच्या नोंदी करणे गरजेचे आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून येणाऱ्या लोकांनी अशा कुठल्याही पोलीस स्टेशन मधे नोंदी केल्याचे ऐकीवात नाही त्यामुळे एखादा गुन्हा त्यांच्या माध्यमातून घडला तर त्याचा तपास पोलीस करू शकत नाही पर्यायाने पिडीत लोकांना पोलीस प्रशासन न्याय देऊ शकत नाही त्यामुळे स्थानिक प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी व त्यांची माहिती संकलित करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत ला व पोलीस पाटलांना पत्र देऊन सूचना करावी व अशा प्रकारची ती कोण व्यक्ति आहे जे परप्रांतातून येऊन इथे येतात त्यांच्या नोंदी ठेवाव्या व बेकायदेशीर ट्रॅक्टर्स चालविणाऱ्या परप्रांतीय यांच्यावर कारवाई करून स्थानिक शेतकरी युवक ज्यांनी ट्रॅक्टर्स घेऊन रोजगार सुरू केला त्यांना त्यांचा हक्काचा रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा. पोलीस निरीक्षक साहेब, वरोरा. पोलीस निरीक्षक साहेब भद्रावती यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी रितेश नागरकर, श्रीकृष्ण धवणे, सूर्यकांत वराटकर, रवींद्र खन्गार, निलेश जरिले, समीर महल्ले, गणेश ठाकरे, सतीश ठाकरे,प्रवीण बदकल, पंकज खामनकर, अनिल कुरेकार,विवेक चिमुरकर, सुनील पिसे, वैभव बावणे, गजानन बदकी, तुकाराम नीब्रँड व असंख्य ट्रॅक्टर्स धारक उपस्थित होते.