
सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील हिरापूर येथे चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मुख्य मार्गाचे कामे सुरू आहे.साईबाबा मंदिर जवळील नवीन टोक नाक्याजवळ काम करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग च्या कामगार वर एका दुचाकी ने भरधाव वेगात त्यांच्या अंगावर नेत अपघात केल्याने यात एकूण चार जण जखमी झाले असून त्यातील 2 जण इंजिनिअर महेश राव व नागेश हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले त्यानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे.तसेच रात्रोला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

सदर अपघात ची माहिती मिळताच सावली चे पोलीस घटनास्थळी पोहचले व अपघात ग्रस्तांना रुग्णालयात भरती केले आहे. सावली वरून व्याहाड खुर्द कडे जाणाऱ्या MH 34 BQ 3376 या गाडीवरील तरूणांनी हा अपघात केला असून यातील हे युवक कोण होते याची माहिती प्राप्त झाली नाही.
