जय भिम मित्र मंडळ आणि भारतीय बौध्द महासभा,नरिमन पॉईंट शाखा (दक्षिण मुंबई) यांच्या वतीने ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन अशोका विजयादशमी साजरी

50

मुंबई : – ( गांधी बोरकर ) ५ ऑक्टोबर रोजी लुंबनी बुद्ध विहार, महात्मा फुले नगर वसाहत, फ्री प्रेस जनरल रोड नरिमन पॉईंट मुंबई येथे साजरा करण्यात आला .त्यावेळी बौद्धचार्य आयु रामचंद्र सावंत गुरुजी यांनी उपस्थित धम्म उपासक व उपासिका यांना उत्तम प्रकारे धम्मचक्र परिवर्तन दिनाचे महत्त्व विशद करून दिले. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्राचालन मंडळाचे व शाखेचे सरचिटणीस आयु सचिन मोतीराम शिंदे ह्यांनी केले त्यावळे जय भिम मित्र मंडळाचे अध्यक्ष आयु संदीप रघुनाथ पवार , भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु गौतम माळी, उपाध्यक्ष आयु गणेश लोखंडे, पर्यटन सचिव आयु वंसंत मोहिते, कोषाध्यक्ष आयु सूर्यकांत माळी, संघटक आयु रामचंद्र गायकवाड, आयु योगेंद्र जाधव तसेच संविधान कमिटीचे कार्याध्यक्ष आयु प्रमोद पवार, कोषाध्यक्ष आयु संदीप मर्चंडे, समता सैनिक दलाचे सैनिक तसेच झोन क्र १ चे सचिव आयु राजेश मोरे , आयु गौतम खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.