
राजुरा,प्रतिनिधी-

बल्हारशाह वनपरिक्षेत्रात सर्व सामान्य जनतेचे कामे विहित कालावधीत पूर्ण व्हाही तथा प्रशासनात गतिमानता यावी याकरिता राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत 71 लाख 82 हजार 380 रुपयांची शेतकऱयांना आर्थिक मदत देण्यात आली
बल्हारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत बल्हारशाह,कारवा,कळमना,मानोरा,उमरी या उपक्षेत्रात वन्यप्राणी कडून होणाऱ्या शेतपिक नुकसान,पशुधन हानी,व मनुष्य जखमी असे एकूण 402 प्रकरणे सेवा पोर्टल वरून तात्काळ निकाली काढून नुकसान भरपाई धारकांना 71 लाख 82 हजार 380 रुपयांचे अर्थसहाय्य रक्कम या वनपरिक्षेत्रातून तत्परतेने अदा करून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला
हा सेवा पंधरवडा उपवनसरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात बल्हारशाह चे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांचे नेतृत्वात सर्व क्षेत्र सहायक ,वनरक्षक यांनी परिश्रम घेत लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी तत्परतेने केले या उपक्रमाचे जनतेतकडून स्वागत होत आहे
