रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत

48

 

सावली तालुक्यातील सोनापुर ते सामदा या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे डांबरही निघाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुविण्याचे काम एक महिन्या अगोदर करण्यात आले होते. पण रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. रस्त्याची स्थिती फारच दयनीय झालेली आहे त्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु लोकप्रतिनधी व सबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.

एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात पत्रक काढतात, वर्तमनपत्रात बातमी छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिध्दी केली जाते. आणि थातुरमातुर कामे केली जातात. आणि एका महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा होतें.
सोनापुर ते सामदा जवळील छोट्या पुलाजवळील खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने आणि त्यातूनच मार्गक्रमन करतांना शाळकरी विद्यार्थी , प्रवाशी, सायकल, दुचाकी वाहन स्लीप होउन अपघात होउ शकतात . भविष्यात अपघात टाळण्यासाठी हे खड्डे लवकरात लवकर बुजवावे. अशी मागणी सोनापुर, सामादा बूज येथील युवक व नागिकांनी केली असून लवकरात लवकर खड्डे न बुजविल्यास खड्यात वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली.