
चंद्रपूर : (गांधी बोरकर )

अविनाश जुमडे आंतरजिल्हा बदली लढ्यातील नामांकित नाव. शिक्षक हितासाठी सदैव तत्पर असणारे अविनाश जुमडे यांची यावर्षी ऑनलाईन बदली प्रक्रियेत नाशिक जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात चंद्रपूर मधे बदली झाली. एक अभ्यासू, अधिकारी वर्गासोबत घनिष्ठ संबंध असणारे, शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रभावीपणे लढा देणारे विश्वासू युवा शिक्षक नेते अविनाश जुमडे यांच्या निवडीने चंद्रपूर जिल्ह्य़ातील शिक्षकांमधे उत्साह व सहकार संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले.
दिनांक 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती या दिवसाचे औचित्य साधून आदरणीय राज्याध्यक्ष शिक्षक सहकार संघटना श्री. संतोष पिट्टलवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्याची कार्यकारणी व समवेत 7 तालुक्याच्या तालुका कार्यकारणी विभागीय अध्यक्ष श्री.रवींद्र कुमार अंबुले,समवेत नवनियुक्त चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश जुमडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गठीत करण्यात आल्या.प्रथमतः विभागीय अध्यक्ष रवींद्र कुमार आंबुले यांचे चंद्रपूर शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तद्नंतर त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत सर्व सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.श्री.अविनाश जुमडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.आपल्या प्रस्ताविकेतून संघटनेची यशोगाथा व पुढे करावयाच्या कामाविषयी आणि त्यासाठी आपल्याला संघटन मजबूत करणे का आवश्यक आहे हे सांगितले. प्रस्थापित संघटनेकडून दुर्लक्षित पण नविन शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न व समस्या यासाठी संघटना प्रयत्नशील असेल असा शब्द अविनाश जुमडे यांनी दिला.तद्नंतर राज्याध्यक्षांच्या परवानगीने व उपस्थित सर्वांच्या साक्षीने श्री. अविनाश जुमडे यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तद्नंतर विभागीय अध्यक्ष श्री रवींद्र कुमार आंबुले यांनी आपल्या मनोगतातून संघटना कशासाठी,संघटनेचे कार्य कोणते याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले सोबतच शिक्षक सहकार संघटना ही एक संघटना नसून एक विचारधारा आहे हे ही विविध उदाहरणे देऊन सांगितले. तद्नंतर जिल्हा उपाध्यक्ष, सचिव,तालुका निहाय अध्यक्ष, सचिव, जिल्हा प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
श्री.अविनाश महादेव जुमडे – जिल्हाध्यक्ष,श्री.सुरेंद्र शेंडे- जिल्हा सचिवजिल्हा उपाध्यक्ष- महेंद्र खिरडकर, तालुकाध्यक्ष
श्री.संदेश गोवर्धन – चंद्रपूर
श्री.रत्नपाल कुकडकर – वरोरा
श्री. सुश्मित लिंगायत चिमूर,श्री.समीर गराडे – ब्रह्मपुरी
श्री. संदिप पवार – बल्लारशहा
श्री.भालचंद्र कासवटे – राजुरा
श्री.महिपाल मांढरे – नागभिड तालुका सचिव-श्री.अमित दुर्गे – चंद्रपूर,श्री.आशिष भिमटे – चिमूर,
श्री. ज्ञानेश्वर नवले – ब्रह्मपुरी, श्री.नितीन पुसाटे – वरोरा,जिल्हा प्रतिनिधी महेंद्र केवटे – वरोरा,विनोद खापर्डे – चिमूर,अमित खेवले – नागभिड,प्रणय पद्मगिरीवार – जिवती,सत्यवान मुंघाटे – चिमूर,आशिष साठोणे – वरोरा
सचिन कांबळे – कोरपना,नरेश रामटेके – सिंदेवाही,सूरज मून -ब्रह्मपुरी,महिला प्रतिनिधी -श्रीमती योगिता अरुण येरणे, कु.रुपाली दयाराम खराबे म्हणून निवड करण्यात आली.या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून श्री. राजानंद दुधे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुरेंद्र शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.संदेश गोवर्धन यांनी केले.अशा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बाईट:- 1) स्वजिल्ह्यापासुन दुर राहुन आंतरजिल्हा बदली लढ्यात सक्रीय योगदान दिले. ज्या संघटनेमुळे बदली झाली तिच्या वाढीसाठी व शिक्षकांच्या महत्वाच्या पण दुर्लक्षित प्रश्न सोडवणार.
अविनाश जुमडे
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष
2) अविनाश जुमडे यांच्या जिल्हाध्यक्ष पदी निवडीने विदर्भातील शिक्षक सहकार संघटना आणखी बळकट झाली.
रविकुमार अंबुले
नागपूर विभाग प्रमुख
