भाजपा तर्फे जिबगांव येथे भव्य आरोग्य शिबिर

82

 

सावली (प्रतिनिधी) खा.अशोक नेते यांनी सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्याने आरोग्य शिबिराच्या सत्कार समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी जिबगांव या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेत्र तपासणी,बी पी सुगर,बाल रोग तपासणी,आदी या शिबिरात आरोग्याची तपासणी करून प्रभावीपणे राबवल हीबाब कौतुकास्पद आहे.

 

 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते बोलतांना ग्रामीण भागामध्ये अशा शिबिराचे आयोजन करणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे.या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या तळागाळापर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा जनतेपर्यंत पोहोचविणे वआरोग्य क्षेत्राकडे विशेष लक्षणे देण्याची गरज आहे.असे प्रतिपादन या प्रसंगी केले.

यावेळी मा.प्रा.अतुल देशकर यांनी ग्रामीण भागामध्ये महिलांना खरा गुटखा खाण्याचा व्यसन जास्त प्रमाणात असल्याने आरोग्य च्या दुष्टीकोणातुन हानीकारक आहे. त्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी केले.

 

या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा महामंत्री संजयजी गजभिये, तालुकाध्यक्ष तथा ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, ता आरोग्य अधिकारी धनश्री अवगड यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शक केले.

या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार,सरपंच पुरुषोत्तम चुदरी, प्रकाश पाटील गडमवार, देवराव सा मुद्दमवार, अर्जुन भोयर,किष्णा राऊत,ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार, माजी प स सभापती छायाताई शेंडे,ग्रा प सदस्य सौ दिक्षा भोयर, ग्रा प सदस्य सौ मोणीका उडिरवाडे,ग्रा प सचिव आशिष आकनुरवार, अंकुश भोपये युवा कार्यकर्ते, दिवाकर गेडाम,दिलीप चुदरी,अशोक पाल, पुरुषोत्तम भोयर,डॉ गोबाडे, डॉ येश्र्वर्या गेडाम वैद्यकीय अधिकारी प्रा आरोग्य केंद्र जिबगांव,संदिप गेडाम,पारस नागापुरे उपसरपंच पारडी,लोकनाथ रायपुरे,प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.