पेटगाव येथील महिलांनी पकड़ली अवैध दारू

112

 

सावली तालुक्यातील पेटगांव येथे अनेक दिवसा पासून अवैध दारू विक्री सुरु होती. गावामध्ये दारू पिण्यासाठी लोकांची आवक वाढली, काही लोकाची दारू पिउन षिविगाळ करने हा प्रकार सतत सुरु असल्याने महिलांना नाहक त्रास व्हायचा या कारणाने येथिल वेद महिला ग्रामसंघ  बचत गटाच्या महिलांनी अवैध दारू विकणाऱ्या इसमांची दारू पकडली.

काल दिनांक 2 ला सायंकाळच्या सुमारास गावात इसम देशी दारू विकत असतांना त्या ठिकाणाहून दारू जप्त केली. व झालेल्या घटनेची माहिती सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली त्यांनी तत्काळ आपली चमू घटनास्थडी पाठविली व महिलांनी पकडलेल्या दारूचा पंचनामा केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार आहे.