चितळाची शिकार प्रकरणी तीन आरोपींना मुद्देमालासह अटक

51

 

राजुरा,(प्रतिनिधी)-

दिनांक 28सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन बल्लारशाह परिक्षेत्रातील उपक्षेत्र उमरी अंतर्गत सातारा भोसले गावात ज्ञानेश्वर विश्वनाथ गावंडे यांचे घरी धाड टाकुन झडती घेण्यात आली . झडती दरम्यान त्यांचे घरात वन्यप्राण्याचे मांस ( सुकवा ) मिळून आले .

सदर मासांबाबत अधिक चौकशी केली असता सदर मांस हे चितळ वन्यप्राण्याचे असुन सरकारी जंगलातुन आणले आहे व सदर वन्यप्राण्याची विल्हेवाट लावणेकामी सातारा भोसले येथील आरोपी कैलाश बाबुराव कन्नाके व श्रीनिवास विठ्ठल पेंदोर यांचा सुद्धा सहभाग असल्याची माहिती मिळाली . तेव्हा सदर घटनेत वापरण्यात आलेले साहित्य ( लोखंडी कुन्हाड -2 , सुरा -1 व बांबुचा ताटवा 1 ) जप्त करण्यात आले . सदर घटनेतील तिनही आरोपींना ताब्यात घेऊन प्राथमिक वनगुन्हा अन्वये भारतीय वन्यप्राणी ( संरक्षण ) अधिनियम 1972 चे विविध कलम अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला . आरोपींना ताब्यात घेऊन मोकास्थळी नेऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले चितळ वन्यप्राण्याचे अवयव ( शिंगासह मुंडके , चामडे व पाय ) जप्त करण्यात आले . सदर अवयव ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करुन दहन करण्यात आला.

सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु ,सहायक वनसंरक्षक. श्रीकांत पवार ,यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे , करीत आहे . सदर सापळा रचुन करण्यात आलेल्या जप्तीच्या कार्यवाही क्षेत्र सहायक अब्बास पठाण , . डी . एस . बावणे , वनरक्षक कु . पायल शेडमाके , कु . जे . बि . अटेल . पि.बि. धांडे , एस . एस . नैताम , टि . ओ . कामले व इतर वनकर्मचारी यांनी केली