ब्रेकिंग न्यूज …आसोला मेंढाच्या नहरात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला गेली वाहून…..

149

..

गोसेखुर्द विभागाच्या आसोला मेंढा नहाराच्या व्याहाड शाखेच्या कालवा मध्ये कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेल्याची घटना सावली तालुक्यातील नवेगाव येथे (दि 28) रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.

भारती वामन वरवडे (25) असे वाहून गेलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे.
सदर महिला ही वडीलाकडे नवेगाव येथे आलेली होती. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास ही महिला गोसेखुर्द अंतर्गत येत असलेल्या व्याहाड शाखा कालवा येथे कपडे धुण्यासाठी गेली होती.

कपडे धुताना अचानक तिचा तोल जाऊन ती वाहत्या पाण्यात पडली. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड करून गावात वार्ता पोहोचवली. तिच्या कुटुंबातील व्यक्ती घटना स्थळी धाव घेतली. परंतु महिला वाहून गेल्याने ती मिळून आली नाही.

सदर घटनेची तक्रार सावली पोलिस स्टेशनला देण्यात आली असून सावली पोलीस शोध मोहीम राबवीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत सदर महिला मिळून आली नव्हती.