बेलगाव, चकपिरंजी येथे शेतकरी अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांची खासदार अशोक नेते यांनी घेतली सहानुभूतीपूर्वक सांत्वन भेट

72

 

 

 

सावली:(प्रतिनिधी)-तालुक्यातील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्याने खासदार अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी विविध घडलेल्या घटने संदर्भात चकपिरंजी व बेलगाव या ठिकाणी अपघातातील मृत्यू पावलेल्या घटनेची माहिती खा.अशोक नेते यांना दिली असता या संबंधी दखल घेऊन चकपिरंजी येथे शेतात काम करीत असतांना अचानक आकाशातील विज स्व.मंगलाबाई सुधाकर येलंटीवार वय ५५ वर्षे हिच्यावर वीज पडल्याने जागीच तिचा मृत्यू झाला.

तसेच बेलगांव येथील सरपंच स्वर्गीय अंबादास पाल वय ५३ वर्ष शेतामध्ये शेत शिवारात काम करीत असतांना शेतामध्ये विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाला.या घडलेल्या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खा.अशोकजी नेते यांनी प्रत्यक्षात चकपिरंजी येथे येलंनटीवार व बेलगांव येथील पाल या दोन्ही परीवारातील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील झाले.व त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूतीपूर्वक सांत्वन देऊन आर्थिक मदत सुद्धा यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडीचे अविनाश पाल, कोषाध्यक्ष अर्जुनजी भोयर,माजी जि.प.सदस्या मनिषाताई चिमुरकर,भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते भुवनजी सहारे, मोतीरामजी चिमुरकर,भाजपाचे युवा कार्यकर्ते डियेच आभारे,मुक्तेश्वर थोरात, लोकनाथजी रायपुरे,प्रकाशजी लाटकर,बबनराव कांडूरवार, उपसरपंच मनोहर बोरकुटे, विनायक बोरकुटे,रविंद्र तिवाडे, राहुल गुरुनुले, लक्ष्मण मंडरे, सुनिल पोवनकार, वासुदेव मांदाळे, नितीन भोपये,ठामदेव बोरकुटे, उमाकांत पाल,अंबादास बोरकुटे, दिवाकर बोरकुटे,साईनाथ चरडे, सुरेश जवादे, तसेच चकपिंरजी व बेलगांव येथील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.