
#########################
############################
सावली तालुक्यातील पालेबारसा येथील एका युवकाने आज गाव तलावात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.

मारुती भास्कर रोहनकर वय 25 वर्ष राहणार पालेबारसा असे या युवकाचे नाव आहे. सदर युवक हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पाथरी येथील पोलिसांना देण्यात आली होती.
त्यानंतर आज त्याचे प्रेत हे तरंगताना अनेकांनी पाहिले सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देताच पाथरी चे ठाणेदार मंगेश मोहड हे घटनास्थळी दाखल झाले.
सदर युवकाचे प्रेत हे तलावाचा बाहेर काढून पंचनामा करण्यात आले.व प्रेत शवविच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या युवकाने आत्महत्या का केली याच्या संदर्भातला तपास पाथरी पोलीस पुढे करीत आहे.