सावली तालुक्यात बिबट मृताअवस्थेत आढळला !

95

 

सावली(सूरज बोम्मावार)
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील चिचबोळीच्या नहाराजवळ बिबट हा मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर नराजवळ बिबट मृताअवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळतात वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्या ठिकाणी बिबट हा पडून होता.त्याच्या शरीरावर काही जखमा असल्याचे कळते आहे.सदर बिबट वर एका दुसऱ्या प्राण्यांनी हल्ला केला असावा असा संशय सुद्धा व्यक्त केल्या जात आहे. बिबट मृत्यू पावल्याची माहिती वनविभागाने अतिशय गुप्तपणे ठेवत सदर प्रकरण हा आपल्या स्तरावर निपटण्याचा प्रयत्न केलेला असल्याचे दिसते आहे.

अंदाजे 1 वर्षाचा असलेला बिबट कसा मेला याची अद्यापही माहिती पुढे आलेली नाही तर त्याची शिकार किंवा अपघात तर झाला नसेल ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.या संदर्भातून शवविच्छेदनाचा अहवाला नंतर बिबट्या मृत्यू कसा झाला हे पुढे येणार आहे.

सध्या सावली तालुक्यामध्ये वाघ व बिबट्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये हल्ल्यांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे.

*बिबट्याच्या हल्यात 2 शेळ्या ठार*

व्याहड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत विरखल चक येथील पटाच्या जागेवर बिबट्याने हल्ला करीत दोन शेळया ठार केल्या.प्रभाकर चिमुरकर, बंडू मेश्राम या दोन शेतकऱ्यांचे शेळ्या चरत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत शेळ्या ठार केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.