
गडचिरोली:-खा.अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन सततच्या केलेल्या पाठपुराव्याला व प्रयत्नाला अखेर यश ..
आज बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देणार
सुधारित खर्चास आणि राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिल्याने राज्य सरकारचा मनापासून,हृदयातून,अंतकरणातून
धन्यवाद !अशी याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय दसरा- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिलासा देणारा राज्य सरकारचा मोठा गिफ्ट आहे.
राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक जनतेच्या कल्याणासाठी, जनकल्याणासाठी हा सरकार कटीबद्ध आहे.
